📰 ताज्या बातम्या

जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन,परतूरला ३२ वर्षानंतर युवक महोत्सवाचे यजमानपद,६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

च
Shamsundar chittoda
6 सप्टेंबर 2026•⏱️ ३ मिनिटे वाचन•
WhatsApp

दि.६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जालना जिल्हास्तरीय युवक महोत्सव परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात ७ व ८ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री मा.ना.मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात येणार असून कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षस्थानी राहणार आहेत, अशी माहिती संस्थेचे सचिव, माजी अधिसभा सदस्य कपिल आकात यांनी दिली.

मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, परतूर व स्वामी विवेकानंद महाविद्यालय, मंठा यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात महाविद्यालयातील बाबासाहेब आकात सभागृह

हात रविवारी (दि.सहा) पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ भारत खंदारे, प्राचार्य डॉ सुधाकर जाधव, जनसंपर्क अधिकारी डॉ.संजय शिंदे , डॉ.शैलेंद्र शेलार, डॉ.शरद बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे सचिव कपिल आकात म्हणाले, युवक महोत्सवाचे उद्घाटन महिला व बालकल्याण राज्यमंत्री मा.ना.मेघनाताई सोकोरे (बोर्डीकर) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी या सोहळयाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. महाविद्यालयाच्या प्रांगणात सोमवारी (दि.सात) सकाळी ९ः३० वाजता हा कार्यक्रम होईल. उद्घाटन उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांची प्रमुख उपस्थिती राहील.

तर पारितोषिक वितरण व समारोप प्रसंगी प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते, कवयित्री गुंजन पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील. संस्थेचे सचिव कपिल आकात अध्यक्षस्थानी राहणार आहेत. मंगळवारी (दि.आठ) सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होईल. या दोन्ही कार्यक्रमांना संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.कुणाल आकात, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ.कैलास अंभुरे प्राचार्य डॉ भारत खंदारे व प्राचार्य डॉ सुधाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दोन दिवसात चार रंगमंचावर २२ कलाप्रकार सादर होणार आहेत. दोन्ही महाविद्यालय तसेच विद्यापीठातील संयोजन समितीचे सर्व सदस्य महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयत्नशील आहेत. मुख्य रंगमंच - सृजनरंग, शब्दरंग, स्व.बाबासहेब आकात सभागृह- सृररंग, इंदिरा मंगल कार्यालय - ललितरंग - मराठा क्रांती भवन या चार रंगमंचावर सर्व स्पर्धा घेणार आहेत. युवक महोत्सवास विद्यार्थी, पालक, नागरिक व रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

६९ महाविद्यालयाचे ५८१ कलावंत सहभागी होणार

युवक महोत्सवात जालना जिल्ह्यातून ७९ महाविद्यालयांचे ५८१ कलावंत सहभागी होणार आहेत. यामध्ये २९२ मुले तर २८९ मुलींचा सहभाग आहे, अशी माहिती विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे यांनी दिली.

*परतूरकरांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा: कपिल आकात*

परतूर शहरात ३२ वर्षानंतर युवक महोत्सव होत असून याचा नागरिक, रसिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे सचिव कपिल आकात यांनी केले आहे. मराठीतील प्रख्यात साहित्यिक बी. रघुनाथ यांची ही जन्मभूमी तालुक्यात आहे. तसेच १९३७ मध्ये मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे पहिले अधिवेशन या शहरात संपन्न झाली होते. अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या परतुरमध्ये आमच्या संस्थेने १९९४ मध्ये केंद्रीय युवक महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले होते. असेही ते म्हणाले.

पाच गटात २२ कलाप्रकार

युवक महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य, वाडःमय व ललित कला अशा पाच गटात एकूण २८ कलाप्रकार सादर होणार आहेत.

कला गट व प्रकार पुढीलप्रमाणे

१. संगीत विभाग - १. भारतीय शास्त्रीय गायन, २. भारतीय सुगम गायन ३. भारतीय समूह गायन ४.पाश्चात्य सुगम गायन ५.पाश्चात्य वाद्य वादन

२. नृत्य विभाग - १. भारतीय शास्त्रीय नृत्य २. लोक आदिवासी नृत्य

३. वाडःमय विभाग - १. वक्तृत्व २. वादविवाद ३. प्रश्नमंजुषा

४. नाटय विभाग - १. नकला १. एकांकिका ३.प्रहसन ४. मूक अभिनय

५. ललित कला विभाग - १. रांगोळी २. चित्रकला ३. कोलाज ४. पोस्टर ५. मृद मूर्तीकला ६. व्यंगचित्र ७. स्पॉट फोटोग्राफी ८.इन्स्टॉलेशन तसेच शोभायात्रा ही सांघिक स्पर्धा असणार आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→6 सप्टेंबर 2026
कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात