📰 ताज्या बातम्या

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांकडून सुटका कंटेनरसह ३५ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त; आरोपी अटकेत

च
Shamsundar chittoda
6 सप्टेंबर 2026•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतूक करण्यात येत असलेल्या २८ गोवंशांची परतूर पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत गोवंशांसह अशोक लेलँड कंपनीचा कंटेनर जप्त करण्यात आला असून, जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ३५ लाख ९० हजार रुपये आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

परतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंशांची कत्तलीच्या उद्देशाने अवैध वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची दखल घेत परतूर पोलिसांच्या पथकाने तात्काळ कारवाई केली. तपासणीदरम्यान अशोक लेलँड कंपनीच्या एमएच ०४ एलक्यू ८८०२ क्रमांकाच्या कंटेनरमधून २८ गोवंशांची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सर्व गोवंशांची सुटका करून कंटेनर ताब्यात घेतला.

या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०४२९/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३(५), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी अटकेत; तपास सुरू

पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. सुटका करण्यात आलेले २८ गोवंश आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला कंटेनर असा एकूण सुमारे ३५ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल रावते करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी व उपविभागीय पोलीस अधिकारी आर. टी. रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, पोलीस उपनिरीक्षक अमोल रावते, पोलीस कॉन्स्टेबल खंदारे, जाधव (ब.क्र. १४१९), गीते, गोविंद पवार, ज्ञानेश्वर वाघ, परमेश्वर माने व नितीन बोन्डारे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→5 ऑगस्ट 2026
सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात