📰 ताज्या बातम्या

मान्सून पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज,मोती तलाव येथे आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची रंगीत तालीम संपन्न

च
Shamsundar chittoda
27 मे 2026•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

आगामी मान्सून कालावधीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ व प्रभावी प्रतिसाद देता यावा, तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम व सज्ज राहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आशिमा मित्तल

यांच्या निर्देशानुसार व जालना शहर महानगरपालिका आयुक्त

अंजली शर्मा, निवासी उपजिल्‍हाधिकारी तथा मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण शशिकांत हदगल यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शहरातील मोती तलाव येथील विसर्जन कुंड परिसरात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन विभाग, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची भव्य रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती.

यावेळी जिल्हाधिकारीआशिमा मित्तल, मनपा आयुक्त अंजली शर्मा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिपक काजळकर तसेच अग्निशमन अधिकारी संदीप दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय अग्निशमन विभाग, जालना, बदनापूर व अंबड येथील अधिकारी व कर्मचारी, तसेच रायगड येथे प्रशिक्षण पूर्ण करून आलेले ‘आपदा मित्र’ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रंगीत तालीमेदरम्यान पूर, अतिवृष्टी, पाण्यात अडकलेल्या नागरिकांचा बचाव, आपत्कालीन स्थलांतरण तसेच नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी वापरण्यात येणाऱ्या अत्याधुनिक शोध व बचाव साहित्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यामध्ये फायबर बोट, इन्फ्लाटेबल रबर बोट, स्कुबा सेट, फायर जेल ब्लॅंकेट, लाईफबोये, बॅटरी कटर, बॅटरी स्प्रेडर, फ्लोटींग पंप, पोर्टेबल जनरेटर, पोर्टेबल पंप, मेगाफोन, सेफ्टी नेट, लाईफ जॅकेट व रिफ्लेक्टर जॅकेट आदी साहित्यांच्या कार्यपद्धती व वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचा सुरक्षितरित्या बचाव कसा करावा, पूरस्थितीत रबर बोटीद्वारे नागरिकांचे स्थलांतरण कशा पद्धतीने करावे, आपत्कालीन परिस्थितीत समन्वय साधून तात्काळ प्रतिसाद कसा द्यावा याबाबत अग्निशमन विभागामार्फत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.

मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी तसेच नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत असून, अशा प्रकारच्या रंगीत तालीम व प्रशिक्षण उपक्रमांमुळे आपत्ती प्रतिसाद यंत्रणांमध्ये समन्वय, तत्परता व कार्यक्षमता अधिक बळकट होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→25 मे 2026
बोव्हाईन ब्रिडींग ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करा : आयुक्त पशुसंवर्धन यांचे निर्देश

बोव्हाईन ब्रिडींग ॲक्टची प्रभावी अंमलबजावणी करा : आयुक्त पशुसंवर्धन यांचे निर्देश

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात