📰 ताज्या बातम्या

प्रा. गणेश चंद्रकांत गाडेकर (सिंहगड कॉलेज पुणे) यांना संगणकीय उपायोजन (कॉम्प्युटर अप्लिकेशन) या विषयामध्ये पी. एच. डी पदवी प्रदान..

च
Shamsundar chittoda
28 एप्रिल 2025•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण

सिंहगड कॉलेज पुणे येथे कार्यरत असलेले प्रा. गणेश चंद्रकांत गाडेकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथून संगणकीय उपायोजन (कॉम्प्युटर अप्लिकेशन) मध्ये "पुणे शहरातील व्यवस्थापन महाविद्यालयांच्या विशेष संदर्भात उच्च शिक्षणातील शिक्षण व्यवस्थापन प्रणालीचा अभ्यास" या विषयावर विद्यावाचस्पती (पी.एच.डी) पदवी प्रदान करण्यात आली.

सदर संशोधन अभ्यासक्रमात त्यांना डॉ. यशवंत वायकर सर सहाय्यक प्राध्यापक - एमसीए

व्यवस्थापनशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या संशोधन काळामध्ये त्यांनी एकुण ०३ भारतीय पेटंट डिझाइन नोंदणी यशस्वीपणे डॉ. वायकर सरा समवेत केली आहे. 0२ स्कोपस इंडेक्स रिसर्च पेपर तसेच ०३ रिसर्च पेपर यूजीसी केअर जर्नलच्या संशोधन पत्रात यशस्वीरित्या प्रकाशित केली आहेत.

त्यांच्या १२ वर्षाच्या एकुण शिक्षण क्षेत्रातील योगदाना मध्ये डॉ. गणेश गाडेकर यांनी NAAC समन्वयक,AICTE समन्वयक, DTE समन्वयक,AISHE समन्वयक, शिक्षण शुल्का समिती (FRA) समन्वयक,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण अधिकारी , महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी, संगणक उपायोजन विभागाचे विभागप्रमुख अश्या विविध प्रकारच्या जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत.

या यशाबाबत डॉ.गणेश गाडेकर यांचे अभिनंदन सिंहगड इन्स्टिट्यूटचे संचालक, SNDT विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नांदवडेकर, डॉ. अभिजीत शेळके सर,सहकारी प्राध्यापक, परतुर माजी सैनिक संघटनाचे अध्यक्ष तुकाराम जी उबाळे, डॉ. सुधाकर जाधव, डॉ. शेषराव वायाळ, कुटुंबातील सदस्य तसेच मित्रमंडळी यांनी केले.

या त्यांच्या यशात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे योगदान दिलेल्या सर्वांचे डॉ. गणेश गाडेकर यांनी मनःपूर्वक आभार मानले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→9 एप्रिल 2025
राष्ट्रीय बंजारा परिषद मराठवाडा युवा विभागीय अध्यक्ष राजाराम पवार यांची निवड

राष्ट्रीय बंजारा परिषद मराठवाडा युवा विभागीय अध्यक्ष राजाराम पवार यांची निवड

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात