📰 ताज्या बातम्या

प्रापंचिक मनुष्याच्या उद्धारासाठी रामकथेचा आधार - रामायाणचार्य विष्णू महाराज बादाड

च
Shamsundar chittoda
19 मार्च 2025•⏱️ ३ मिनिटे वाचन•
WhatsApp

कलयुगाच्या प्रभावाने संसारीक मनुष्याची साधक वृती ही बाधीत होत आहे . मनुष्य आज काल दुसर्याचे बघून अनुकरण करत आहेत व त्याला शिष्टाचार समजत आहे पंरतू एखाद्या साधकाने केलेला परमार्थ त्याने केलेल्या साधना यांचे अनुकरण कधीच करत नाही कारण की त्याच्यावर असलेला कलीचा प्रभाव आहे तो प्रभाव ससांरिकाला टाळा याचा असेल . तर त्याला रामकथेचा आधार घ्यावाच लागेल असे प्रतिपादन रामायणाचार्य विष्णू महाराज बादाड यांनी कानडी येथे केले रामकथा ही आपल्या संपूर्ण जीवनाचे जीवनामृत असून त्या जीवनमा मृताचे रसपान आपण कथेच्या माध्यमातून जर घेतले तर या राकथेची कृपा संसारी कावर झाल्याशिवाय राहणार नाही गरज आहे ती ही रामकथा आपण मनोभावे स्वीकारली पाहिजे

आज काल संकट आल्यावरच आपल्याला देव आठवतो अशा संकृचित वृतिने परमार्थ करणार्याना कसा मोक्ष प्राप्त होणार भगवत भक्ती करत असताना कुठलाही स्वार्थ समोर ठेवून जर आपण भक्ती करू तर ती भगवंताला कधीच मान्य नसते . रामकथा की प्रत्येकाच्या जीवनाचा आधार असून रामांचा आपल्या स्वकीया बदल केलेला त्याग व समर्पण भाव आपण कधीच करणार नाही रामाचे बंधुप्रेम आपण स्वीकारावे हाच राम कथेचा उपदेश आज च्या या युगात महत्वाचा आहे

प्रापंचिक मानसाला सुखी जीवन जगण्यासाठी त्रेतायुगातील रामप्रपुच चरित्र श्रवण करण्याची आवश्‍यकता आहे... असे विष्णु महाराज बादाड यांनी सांगीतले....

कानडी येथे 13 मार्च चालु झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये तुकाराम महाराज गाथा पारायण, हरिपाठ किर्तन व तुलशी राम कथा अशा कार्यक्रमाची रेलचेल सुरू आहे... यानी आज राम कथा संसारीक मानसाला ऐकने किती गरजेच आहे ते सांगीतले... कारण रामप्रपुच चरित्र एका आदर्श राजाची कथा आहे, एका आदर्श भावाची कथा आहे,एका आदर्श पतीची कथा आहे एका आदर्श मित्राची कथा आहे ऐवढच नाही तर राम प्रभुची कथा एका आदर्श शतृची कथा आहे... राम प्रभुणे आपल्या शतृला रावनाला सुद्धा मोक्ष दिला... असे अनेक भाग अनेक संदेश या रामायणातुन प्रतेकाला घेण्यासारखे आहेत... एका घराचा मालक कसा असावा हे राम प्रभुच चरित्र ऐकल्यानंतर आजच्या घरातील मालकाला कळेल कि घराचा मालक कसा असावा... रामायणातील सावत्र बंधुप्रेम काय आहे हे आजच्या प्रतेक भावाने ऐकन गरजेच आहे कारण बंधुप्रेमाची आजही प्रतेक घरात गरज आहे... घरातील प्रतेक पत्निने राम कथा ऐकली पाहिजे या राम कथेच्या माध्यमातून सितामातेच चरित्र ऐकल्यानंतर आपल्या घरातील पत्निला कळेल कि एक पत्नी कशी आदर्श आसली पाहिजेत... प्रतेकाला या राम कथेतुन घेण्यासारखे संदेश आहेत म्हणून प्रतेकाने श्रवण करण गरजेच आहे... असे बादाड महाराज यांनी कथा आरंभी संबोधित केल आहे.

राम कथा ही मनुष्याला आदरभाव बंधूंता त्याग व समर्णण शिकवते आज काल प्रत्येक कृटूबांने राम कथा स्वीकारली तर महाभारत होणार नाही असा उपदेश बादाड महाराज यांनी केला

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→18 मार्च 2025
भगवत भक्ती मनुष्याच्या उद्धाराचे साधन - ह भ प ओमकार महाराज मोरे

भगवत भक्ती मनुष्याच्या उद्धाराचे साधन - ह भ प ओमकार महाराज मोरे

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात