📰 ताज्या बातम्या

भगवत भक्ती मनुष्याच्या उद्धाराचे साधन - ह भ प ओमकार महाराज मोरे

च
Shamsundar chittoda
18 मार्च 2025•⏱️ ३ मिनिटे वाचन•
WhatsApp

तळणी येथून जवळच असलेल्या कानडी येथे पाचव्या दिवशी ह भ प ओमकार महाराज मोरे यांची किर्तन सेवा सपन्न झाली जगदगुर तुकाराम महाराज यांच्या . सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावसी दुरी भवाचिये पुरी वाहावसी . या अभंगावर निरूपणकेले

मनुष्याला हा नरदेह फक्त भगवत भक्ती साठी दिला आहे या कलयुगात फक्त भगवत भक्तीच सोपी आहे आणि जन्माला येऊन जर विठ्ठल भक्ती केली नाही जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही . संसाराची बरोबरी कधीच मनुष्यांकडून पूर्ण होऊ शकत नाही कारण . ससारातील अपेक्षा खुप आहे . पंरतू भगवत भक्ती मध्ये फक्त तुमचा निस्वार्थ भाव पाहिजे तोच भाव देवाला प्रिय असतो . जगात सांगणार्याची संख्या खूप मोठी आहे पण आपण ऐकावे कोणाचे तर त्या अधिकार सपन्न असलेल्या संतांचे एकांवे ते संत म्हणजे ज्ञानोबा तुकोबा त्यांनी आपल्या साठी खूप त्याग केला आहे अशा अधिकारी संताचेच आपण एकले तर आपले जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही .

जगदगुर तुकोबारायांचा गाथा म्हणजे त्याच्या आयुष्यात आलेल्या अनुभव आहे . त्या अनुभवारच तुकोबांनी आपल्या साठी आदर्शव्रत गाथा दिला जो की तुमच्या आमच्या उध्दाराचा गाथा आहे . मनुष्याने आयुष्यात कुठल्याच गोष्टीची घमेन्ड करू नये ना सतेची ना सौदर्याची ना संपतीची एश्वर्य सपन्न रावणा सारख्याला त्याचे ऐश्वर्य घमेंडी मुळे टिकवता आले नाही .

कथा आणि किर्तन हे संस्काराचे प्रतिक आहे ते संस्कार फक्त धर्ममंडपातच होतात त्यामुळे किर्तन कथा यातून मिळणारे विचार हे प्रत्येकाने अंगीकारले पाहिजे तरच आपण केलेल्या सप्ताह चे फलित झाल्याशिवाय राहणार नाही .

या कलयुगात यज्ञ याग करून काही उपयोग नाही या युगात फक्त भगवत भक्तीच ही मनुष्याच्या उद्धाराचे साधन आहे म्हणून तुकोबांनी सुद्धा आपल्याला भक्ती मार्गाला चालण्याचे साधन दाखवून दिले आहे ते साधन म्हणजे विठ्ठल भक्ती त्याच्या शिवाय दुसरे कुठलेच चितन करू नये आणि ते चिंतन जर तुम्ही केले नाही तर हा जन्म वाया गेला म्हणून समजा . उत्पती झाली त्याचा नाश अटळ आहे . आपल्याला मिळालेला हा मधला काळ आपल्यासाठी सुवर्णकाळ आहे त्याचा उपयोग आपण केला पाहिजे या कलयुगात मनुष्य संसाराला जवळ करतो परंतू परमेश्वराला दुर करतो आहे .मनुष्यानी मरणाला आणि

परमेश्वरला कधीच विसरू नये . मनुष्याचा भाव देवाप्रती हा शुद्ध भाव असला पाहिजे विदुरा चा भाव जसा भगवान श्रीकृष्णां प्रति होता तो आदर्श घेऊन मनुष्याने आपल्या भगवत भक्तीचा मार्गाने चालने गरजेचे असल्याचे प्रतिपादन ह भ प ओमकार महाराज मोरे यांनी कानडी येथे केले

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→17 मार्च 2025
तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थजेणेकरून केला पुरुषार्थ - हभप अर्जून महाराज बदाड

तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थजेणेकरून केला पुरुषार्थ - हभप अर्जून महाराज बदाड

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात