📰 ताज्या बातम्या

दलित महासंघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी विजय जाधव यांची नियुक्ती

च
Shamsundar chittoda
4 ऑगस्ट 2026•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

दलित महासंघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विजय दिगंबरराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दलित महासंघाचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी नियुक्तीपत्र देऊन ही नियुक्ती जाहीर केली.

नियुक्तीपत्रानुसार, विजय जाधव यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दलित, वंचित, पीडित व अन्यायग्रस्त समाजघटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या विचारांनुसार कार्य करावे, अशी अपेक्षा संस्थापक-अध्यक्षांनी व्यक्त केली आहे.

दलित महासंघ ही महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी प्रेरित सामाजिक संघटना असून, समाजातील दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी कार्यरत आहे.

यावेळी विजय जाधव यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी शुभेच्छा देत त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन केले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→3 ऑगस्ट 2026
धर्म, शील आणि संयमाचे रक्षण करणाऱ्यालाच खरा विजय लाभतो : महासती निर्मलाजी म.सा.

धर्म, शील आणि संयमाचे रक्षण करणाऱ्यालाच खरा विजय लाभतो : महासती निर्मलाजी म.सा.

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात