📰 ताज्या बातम्या

विवेकानंद सेवा केंद्राचे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश

च
Shamsundar chittoda
19 मे 2026•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे , यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विवेकानंद सेवा केंद्र परतुर संचलित विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर, विवेकानंद पब्लिक स्कूल परतुर, विवेकानंद प्राथमिक व माध्यमिक शाळा परतुर, विवेकानंद इंग्लिश स्कूल केंधळी मंठा, अशा 4 शाळेचे एकूण 42 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये,विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून केंद्राच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.

या परीक्षेमध्ये एकूण 42विद्यार्थी पात्र ठरले असून विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालक, शिक्षक व संस्थेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव व शिक्षकांचे परिश्रम यामुळे हे यश मिळाले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एस.जी.बाहेकर साहेब, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक आदरणीय संदीप दादा बाहेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती. शिंदे मॅडम, प्रिन्सिपल महाजन सर, दंदाले सर ,विष्णू बाहेकर सर्व शिक्षक वृंद,सर्व पालक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकवृंद, पालक व संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे मत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून विवेकानंद सेवा केंद्राचे कौतुक करण्यात येत आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→19 मे 2026
न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल आणि ज्यू. कॉ., च्या दोन विद्यार्थीनी शिष्यवृत्ती साठी पात्र.

न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल आणि ज्यू. कॉ., च्या दोन विद्यार्थीनी शिष्यवृत्ती साठी पात्र.

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात