📰 ताज्या बातम्या

मंठा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त भव्य हिंदू संमेलन; एकतेचा, स्वदेशीचा व पर्यावरण संवर्धनाचा संदेशभव्य शोभायात्रेने शहर दुमदुमले; प्रमुख वक्ते संजय राव तालखेडकर यांचे प्रभावी मार्गदर्शन

च
Shamsundar chittoda
13 एप्रिल 2026•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मंठा शहरात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने शहरात आकर्षक व उत्साहपूर्ण शोभायात्रा काढण्यात आली. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून एकात्मतेचे दर्शन घडवले.

संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून संजय राव तालखेडकर यांनी मार्गदर्शन करताना हिंदू संस्कृतीची वैशिष्ट्ये आणि सध्याच्या काळातील जबाबदाऱ्या अधोरेखित केल्या. “हिंदू संस्कृती ही अनादिकालापासून टिकून राहिलेली असून सततच्या आक्रमणांनंतरही ती अधिक सक्षम झाली आहे. जगाला शांततेचा संदेश देण्याचा अधिकार हिंदू समाजालाच आहे,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, “आजच्या काळात हिंदू समाजाने जाती-पातीच्या भिंती ओलांडून एकत्र येणे ही काळाची गरज आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक आहे.” स्वामी विवेकानंदांसारख्या महापुरुषांनी केलेली भविष्यवाणी आज साकार होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

परमेश्वरप्राप्तीचा अधिकार सर्वांना समान आहे, ही हिंदू धर्माची मोठी देणगी असल्याचे सांगत त्यांनी संत परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. “जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगातून समाज एकसंघ ठेवण्याचा संदेश मिळतो. भेदभाव दूर करून समाज एकत्र राहणे गरजेचे आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या संमेलनातून संघाच्या वतीने पंचसूत्री अभियानाचा स्वीकार करण्याचे आवाहन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनावर विशेष भर देत त्यांनी सांगितले की, “वाढते प्रदूषण आणि प्लास्टिकचा अतिरेक यासाठी आपणच जबाबदार आहोत. प्रत्येकाने प्लास्टिकचा वापर टाळून किमान एक वृक्ष लावण्याचा संकल्प करावा.”

कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व सांगताना त्यांनी नमूद केले की, “भारतीय कुटुंब व्यवस्था ही आदर्शवत आहे. मात्र आधुनिक जीवनशैलीत ती दुर्बल होत आहे. आठवड्यातून किमान एकदा कुटुंबाने एकत्र येऊन जेवण, भजन-कीर्तन किंवा देवदर्शन करणे आवश्यक आहे. यामुळे संस्कार बळकट होतील.”

स्वदेशीचा पुरस्कार करत त्यांनी सांगितले की, “आपण आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असताना परदेशी वस्तूंचे आकर्षण टाळणे गरजेचे आहे. स्वदेशी वस्तूंचा वापर केल्यास देशाची अर्थव्यवस्था बळकट होईल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल.”

कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी हिंदू समाजाने अभिमानाने एकत्र येऊन राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याचे आवाहन केले. संमेलनामुळे मंठा शहरात उत्साहाचे व एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→7 एप्रिल 2026
स्वसंस्कृतीची ओळख आणि संघटनाच परिवर्तनाचा मार्ग डाँ प्रमोद आकात यांचे दुधा येथेप्रतिपादन, संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समाजाला आत्मभानाची गरज छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून एकतेचा संदेश,  दूध येथे विराट हिंदू संमेलन संपन्न

स्वसंस्कृतीची ओळख आणि संघटनाच परिवर्तनाचा मार्ग डाँ प्रमोद आकात यांचे दुधा येथेप्रतिपादन, संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समाजाला आत्मभानाची गरज छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातून एकतेचा संदेश, दूध येथे विराट हिंदू संमेलन संपन्न

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात