📰 ताज्या बातम्या

न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

च
Shamsundar chittoda
11 मार्च 2026•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

दिनांक 09 जानेवारी 2026 सोमवार रोजी न्यू वंडर किड्स इंग्लीश स्कूल अँड ज्यू. कॉलेज, परतूर येथे महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महिला दिनाचे उत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रियंकाताई रक्षे यांच्या हस्ते करण्यात आले सर्व प्रथम जिजामाता भोसले, रमाबाई आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व फित कापून करण्यात आले. याप्रसंगी संस्था मार्गदर्शक पार्वतीबाई सोळंके, सचिव छाया बागल, प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्षा विशाखा राखे, उपमुख्याध्यापिका पुजा मोरे उपस्थित होते. यावेळी महिलांनी स्वतःच्या आरोग्याचे संरक्षण कसे करावे याचे उत्तम मार्गदर्शन मीरा झरेकर यांनी केले तद्नंतर नीलिमा मसलकर पाल्याच्या संस्काराविषयी भाष्य केले. तसेच घरकाम सांभाळून नोकरी व व्यवसाय करणाऱ्या कर्तबगार महिलांचा संस्थे तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. याकार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून नगरसेविका स्नेहा अग्रवाल, नगरसेविका कल्पना डहाळे, संजीवनी खालापूरे, रेवती राखे उपस्थित होते.

संस्था अध्यक्ष नारायण दादा सोळंके, मुख्य सल्लागार गणेश सोळंके, मुख्याध्यापक गोविंद पाठक यांनी सर्व उपस्थित महिलांना व महिला पालकवर्गाला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहतेशाम खान यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोरी पाठक यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका शालू पारखे दामिनी टाकणखार, मंगल वेडेकर, गीता पायघन, शारदा चव्हाण, आरती सारस्वत, गोपीनाथ जगदाळे, दिनेश साठे, सुलेमान सय्यद तसेच सेविका ज्योती निलेवाड, पार्वती गुंजमूर्ती आणि सेवक सुखदेव सस्ते उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप परिश्रम केले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→5 मार्च 2026
पुण्य परोपकार, पाप ते परपीडा” संतविचारांचा जागर, कीर्तनातून समाजमनाला स्पर्शसंतविचारांचा दीप पुन्हा प्रज्वलित संदीप महाराज खंडागळे यांचा कानडी येथे हितोपदेश

पुण्य परोपकार, पाप ते परपीडा” संतविचारांचा जागर, कीर्तनातून समाजमनाला स्पर्शसंतविचारांचा दीप पुन्हा प्रज्वलित संदीप महाराज खंडागळे यांचा कानडी येथे हितोपदेश

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात