📰 ताज्या बातम्या

आरक्षण वर्गीकरण आमलबजावनी मोर्चाला मातंग समाजाचा उत्सुर्फ प्रतिसाद .!,अन्याय अत्याचाराच्या विरोधात उपजिल्हाधिकारी यांना मुलींच्या वतीने निवेदन सादर..!

च
Shamsundar chittoda
8 एप्रिल 2025•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

आज दिनांक ८ एप्रिल रोजी परतूर शहरात सर्वोच्य न्यायालयाच्या निर्देशानुसार अनुसूचित जाती प्रवर्गात आरक्षण वर्गीकरण लागू करणे आणि मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचारा विरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.

प्रामुख्याने मोर्च्यात अनुसूचित जाती प्रवर्गात आरक्षण वर्गीकरण झालेच पाहिजे आणि आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणीच्या पाट्या हातात घेत नागरिकांनी उत्सूर्फपने घोषणा दिल्या.क्रांतीगुरू लहुजी साळवे चौक ते उपजिल्हाधिकारी कार्यालय या मार्गे शिस्तबद्धतेने मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.

दरम्यान उपजिल्हाधिकारी यांना कुमारी माहेश्वरी आव्हाड,अश्विनी हिवाळे,रूपाली हिवाळे,आरती साबळे या मुलींच्या वतीने निवेदन देण्यात आले.

व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते गणपत भिसे,ॲड.विलास साबळे,ॲड राम चव्हाण,

मारुती वाडेकर,राजू कसबे,संजू गायकवाड,भास्कर नाना शिंदे,शिवाजी भाऊ कांबळे,संतोष तुपसौंदर्य,

रविकांत जगधने,शिवराज जाधव,रंगनाथ गजले, सुरेश साळवे,रवी पाखरे किसन लांडगे,गुलाब साठे,नामदेव साळवे यांची उपस्थिती होती.

आयोजित मोर्च्यात दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजीच्या माननीय सर्वोच्य न्यायालय निर्णयाच्या अनुषंगाने १५ ऑक्टोंबर २०२४ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णया नुसार महाराष्ट्र शासनाने राज्यात तात्काळ आरक्षण वर्गीकरण विधेयक मंजूर करून येत्या जुन महिन्या पासून आरक्षण वर्गीकरणाची आमलबजावणी करून अनुसूचित जातीतील अतीवंचित जातींना संविधानिक समतेचा सामाजिक न्याय मिळवून द्यावा.याबाबतची मागणी

व्यासपीठावरील मान्यवरानी केली.

दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी परभणी येथील अतीवंचित असणाऱ्या मातंग समजातील निष्पाप अल्पवयीन बालीकेवर निराधमानी केलेला अत्याचार प्रकार अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे.याबाबत आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी विशेष चौकशी पथक (SIT) स्थापन करून सदर खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा आणि नराधम आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि या प्रकरणातील अधिकच्या आरोपींवर कायदेशीर कडक कार्यवाही करावी.

आणि महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीतील अतीवंचित असणाऱ्या मातंग समाजावर दैंनदिन सातत्याने घडत असलेले अन्याय अत्याचार मालिका ही अत्यंत दुर्दैवी बाब असून याबाबत महाराष्ट्र सरकारने प्रत्येक घटनेतील गुन्ह्यात विशेष चौकशी पथक स्थापन करून दोषी आरोपींवर कायदेशीर कडक शासन करावे आणि मातंग समाजाला तात्काळ न्याय मिळवून द्यावा.

याबाबत मोर्च्यातची मागणी करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक साबळे,इंद्रजीत हिवाळे,ज्ञानेश्वर साळवे,विठ्ठल भारसाकळे,दत्ता हिवाळे,विलास लोखंडे,सुंदर भारसाकळे,पांडुरंग नाटकर,प्रकाश लोंढे,लखन कांबळे,गणेश आव्हाड, यांनी परिश्रम घेतले.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→6 एप्रिल 2025
योगी  प्रधान यांना महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार जाहीर

योगी प्रधान यांना महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार जाहीर

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात