📰 ताज्या घडामोडी

मारवाडी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या शितला माता मंदिर परिसर स्वच्छता करा-विकासकुमार बागडी

च
Shamsundar chittoda
3 मार्च 2025•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

जालना प्रतीनीधी समाधान खरात/नरेश अन्ना

काद्राबाद येथील दर्गा बेस समोर निजाम कालीन पुर्वीचा शितलामाता मंदिर असून दर वर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा दि. 15 मार्च ते 28 मार्चपर्यंत पुजा महोत्सव करण्यात येणार आहे.

सदर मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि पुजासाठी अग्रवाल, माहेश्वरी, ब्राम्हण, जैन, जाट, गुजर, नाभिक असे पंचवीस ते तीस हजार मारवाडी राजस्थानी समाजातील लोकं सहकुटूंब येणार आहेत. सदर मारवाडी समाजाचे लोकं हमखास रात्री 12 ते सकाळी 8 या वेळेत जास्त संख्येने पुजाला येत असल्याचे व्हाईस ऑफ मिडीयाचे प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात श्री. बागडी यांनी जालना महानगर पालिकेचे स्वच्छता विभाग प्रमुख पंडीत पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या पाणी वेस ते राजमहेल टॉकीज, मुर्तीवेस पर्यंत महानगर पालिकेने अतिक्रमण काढलेले आहे. त्यामुळे रस्त्यावर मातीचे ढिग असून रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. तसेच शितलामाता मंदिर परिसरात कचरा आणि घाण पसरलेली आहेे. तात्काळ स्वच्छता विभागामार्फत ट्रॅक्टर लावून हा परिसर स्वच्छ करुन देण्यात यावा, मंदिर परिसरातील अनेक पथदिवे बंद असून ते तात्काळ चालू करण्यात यावे व मंदिरासमोर एका अज्ञान व्यक्तीने बेकायेदेशिरपणे मटन दुकान चालू केलेली आहे. ती त्वरीत बंद करण्यात यावी. येणार्‍या भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, भाविकांना विनंती करण्यात येते की, सध्या शहरामध्ये गुन्हेगारी वाढली असून दर्शनासाठी येत असतांना दागिने किंवा महाग वस्तू घेऊ नये, तसेच 12 नंतरचे दर्शन टाळून सकाळी 5 ते रात्री 10 असे दिवसभर दर्शन, पुजा करता येईल, अशी विनंतीही श्री. विकासकुमार बागडी, नगरसेवक विष्णू पाचफुले, सामाजिक कार्यकर्ते मेघराज चौधरी यांनी केली आहे.

निवेदन देतांना विकासकुमार बागडी यांच्यासह नगरसेवक विष्णू पाचफुले, सामाजिक कार्यकर्ते मेघराज चौधरी, स्वच्छता विभाग पअमुख पंडीत पवार, लिपीक ऋषी शिडुते आदी दिसत आहेत.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→2 मार्च 2025
महाबोधी बुद्ध विहार बिहार येथे बौद्ध भिक्षूंकाच्या उपोषणास बसलेले बौद्ध भिक्षू भिक्षुनी यांच्या आंदोलनास जालना येथे पाठिंबा जाहीर

महाबोधी बुद्ध विहार बिहार येथे बौद्ध भिक्षूंकाच्या उपोषणास बसलेले बौद्ध भिक्षू भिक्षुनी यांच्या आंदोलनास जालना येथे पाठिंबा जाहीर

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात