📰 ताज्या घडामोडी

विवेकानंद इंग्लिश स्कूल ,परतूर मध्ये रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार प्रशिक्षण उत्साहात संपन्न!

च
Shamsundar chittoda
4 फेब्रुवारी 2025•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण

रथसप्तमीच्या निमित्ताने सूर्यनमस्काराचे महत्त्व अनन्यसाधारण असून, निरोगी आरोग्य व सकारात्मक ऊर्जेसाठी सूर्यनमस्कार महत्त्वाचे मानले जाते. विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य व आनंद वाढावा, या उद्देशाने विवेकानंद शाळेच्या वतीने विशेष सूर्यनमस्कार प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

या प्रशिक्षणासाठी योगतज्ञ राधा तांबे व गजानन वायाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी विद्यार्थ्यांनी १२ सूर्यनमस्कारांचे शास्त्रीय पद्धतीने प्रशिक्षण घेतले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनानंतर शाळेचे अध्यक्ष संदीप बाहेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योग, ध्यान व प्राणायाम महत्त्वाचे आहेत. शाळेत अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भालचंद्र महाजन सर, विजय धंदाळे सर व शिक्षकवृंदांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सकारात्मक ऊर्जा हा कार्यक्रमाचा मुख्य गाभा ठरला!

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→4 फेब्रुवारी 2025
परतूरच्या शास्त्री विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा

परतूरच्या शास्त्री विद्यालयात स्वयंशासन दिन साजरा

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात