📰 ताज्या घडामोडी

पवित्र पर्व कुंभमेळ्यात मराठवाड्यातील भक्तांना जाण्यासाठी विशेष रेल्वे - खा.कल्याण काळे

च
Shamsundar chittoda
14 जानेवारी 2025•⏱️ ४ मिनिटे वाचन•
WhatsApp

जालना प्रतीनिधी नरेश अन्ना

खासदार डॉ.कल्याण काळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनीकुमार यांच्याकडे हिन्दू धर्मातील अतिशय पवित्र पर्व कुंभमेळ्यात मराठवाड्यातील भक्तांना जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात याव्यात अशी मागणी केली होती त्यानुसार रेल्वेमंत्री अश्विनीकुमार यांनी रेल्वे सोडण्याचे जाहीर केले आहे. मराठवाड्यातील भक्तांना खालील रेल्वेने कुंभमेळ्यात अहलाबाद येथे जाता येईल याचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती खासदार डॉ.कल्याण काळे यांनी केली आहे.

प्रयागराज, उत्तर प्रदेश येथील कुंभ मेळा ला जाण्याकरीता नांदेड-पटणा-नांदेड, औरंगाबाद-पटणा-औरंगाबाद , काचीगुड-पटणा-काचीगुडा आणि सिकंदराबाद-पटणा-सिकंदराबाद विशेष रेल्वे प्रयागराज छिवकी मार्गे चालविण्यात येत आहेत

1. गाडी क्रमांक 07721 नांदेड ते पटणा ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी रात्री 23.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, जबलपूर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, काटणी, संटणा, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.

2. गाडी क्रमांक 07722 पटणा ते नांदेड विशेष गाडी पटणा येथून दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 04.30 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील.

3. गाडी क्रमांक 07725 काचीगुडा ते पटणा मार्गे नांदेड ही विशेष गाडी काचीगुडा येथून दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी दुपारी 16:45 वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, जबलपूर, इटारसी, पिपरिया, जबलपूर, काटणी, संटणा, माणिकपूर, प्रयागराज चौकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बकसर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.

4. गाडी क्रमांक 07726 पटणा ते काचीगुडा मार्गे नांदेड ही विशेष गाडी पटणा येथून दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच काचीगुडा येथे सकाळी 07:00 वाजता पोहोचेल.

5. गाडी क्रमांक 07099 नांदेड ते पटणा ही विशेष गाडी नांदेड येथून दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 23.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर,जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.

6. गाडी क्रमांक 07100 पटणा ते नांदेड विशेष गाडी पटणा येथून दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच नांदेड येथे दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 04.30 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील.

7. गाडी क्रमांक 07101 औरंगाबाद- पटणा ही विशेष गाडी औरंगाबाद येथून दिनांक 19 फेब्रुवारी 2025 आणि 25 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळ 19.00 वाजता सुटेल आणिजालना, सेलू ,परभणी,पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर,जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.

8. गाडी क्रमांक 07102 पटणा ते औरंगाबाद विशेष गाडी पटणा येथून दिनांक 21 फेब्रुवारी 2025 आणि 27 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच औरंगाबाद येथे अनुक्रमे दिनांक 23 फेब्रुवारी 2025 आणि दिनांक 29 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 07.45 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील.

9. गाडी क्रमांक 07103 काचीगुडा ते पटणा मार्गे नांदेड ही विशेष गाडी काचीगुडा येथून दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 16:45 वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, , इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.

10. गाडी क्रमांक 07104 पटणा ते काचीगुडा मार्गे नांदेड ही विशेष गाडी पटणा येथून दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच काचीगुडा येथे दिनांक 26 फेब्रुवारी 2025 सकाळी 07:00 वाजता पोहोचेल. या गाडीत 22 डब्बे असतील.

11. गाडी क्रमांक 07105 सिकंदराबाद ते पटणा मार्गे नांदेड ही विशेष गाडी सिकंदराबाद येथून दिनांक 07 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळ 17.00 वाजता सुटेल आणि निजामाबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापुर, खंडवा, , इटारसी, पिपरिया, नरसिंहपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर मार्गे पटणा येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.

12. गाडी क्रमांक 07106 पटणा ते सिकंदराबाद मार्गे नांदेड ही विशेष गाडी पटणा येथून दिनांक 09 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 15:30 वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गानेच सिकंदराबाद येथे दिनांक 11 फेब्रुवारी 2025 सकाळी 11:30 वाजता पोहोचेल. या गाडीत 20 डब्बे असतील.

सर्व गाड्यांचे वेळापत्रक यासोबत जोडलेले आहे सर्वांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन खासदार डॉ.कल्याण काळे यांनी केले आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→13 जानेवारी 2025
खा. कल्याण काळे यांनी खत टंचाई च्या अनुषंगाने घेतली आढावा बैठक

खा. कल्याण काळे यांनी खत टंचाई च्या अनुषंगाने घेतली आढावा बैठक

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात