📰 ताज्या घडामोडी

८ ऑक्‍टोबरला मॉडेल कॉलेजमध्ये जिल्‍हास्‍तरीय ‘आविष्‍कार’चे आयोजन

च
Shamsundar chittoda
28 सप्टेंबर 2024•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जिल्‍हास्‍तरीय आविष्‍कार अधिवेशनाचे आयोजन दि.८ ऑक्‍टोबर रोजी मॉडेल कॉलेज, घनसावंगी येथे करण्‍यात आले आहे.

विद्यार्थ्‍यांमधील सुप्‍त नावीन्‍यपूर्ण वैज्ञानिक प्रतिभा आणि क्षमतांचा आविष्‍कार व्‍हावा, त्‍यांच्‍यामध्‍ये संशोधन जाणिवा विकसित होऊन त्‍यांना अधिछात्रवृत्तीच्‍या स्‍वरूपात बळ मिळावे यासाठी राजभवनद्वारे २००६ पासून ‘आविष्‍कार’ या आंतरविद्यापीठीय संशोधन व नवोपक्रम स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात येते.

यावर्षीचा राज्‍यस्‍तरीय ‘आविष्‍कार’ डॉ . बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे जानेवारी २०२५ मध्‍ये संपन्‍न होणार आहे. यासाठीची पूर्वतयारी म्‍हणून कुलगुरू प्रा. विजय फुलारी यांच्‍या मार्गदर्शनाखाली जिल्‍हास्‍तरीय आविष्‍कार अधिवेशनाचे आयोजन करून त्‍यानंतर विद्यापीठस्‍तरीय आविष्‍कार संपन्‍न होणार आहे.

शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांमधील संशोधन कल्‍पकता व नवोपक्रमांना अधिकाधिक चालना मिळावी, ग्रामीण भागातील अधिकाधिक विद्यार्थी सहभागी व्‍हावेत यासाठी यावर्षीचा आविष्‍कार प्रथमत: जिल्‍हास्‍तरावर घेण्‍यात येत आहे यासाठी नोंदणी दि. १६ सप्‍टेंबर ते दि. ३० सप्‍टेंबर पर्यंत राहणार आहे

याचे गट खालील प्रमाणे असतील

ज्ञानशाखानिहाय सहा गट : पहिला गट - मानव्‍यविद्या, भाषा आणि ललित कला, दुसरा गट - वाणिज्‍य, व्‍यवस्‍थापन व विधी, तिसरा गट- विज्ञान, चौथा गट- कृषी व पशुसंवर्धन, पाचवा गट - अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि सहावा गट - औषधनिर्माणशास्‍त्र यांचा समावेश

संशोधक विद्यार्थ्‍यांचे तीन स्‍तर :

पदवी (युजी), पदव्‍युत्तर पदवी (पीजी) आणि पदव्‍युत्तर पदवीनंतरची पदवी (पोस्‍ट पीजी)

वयोमर्यादा :

पदवी- वय वर्ष २५, पदव्युत्तर पदवी- ३० आणि पोस्‍ट पीजीकरिता वयोमर्यादा नाही या सर्धा करीता जिल्‍हा समन्‍वयक : प्रा. पुरुषोत्तम देशमुख, प्रा. रमेश चौंडेकर

मुख्‍य संयोजन समिती :

समन्‍वयक डॉ. भास्‍कर साठे, प्रा.बी.एन.डोळे, प्रा. प्रवीण यन्‍नावार, प्रा.शशांक सोनवणे, प्रा.पुरुषोत्तम देशमुख, प्रा.आनंद देशमुख, डॉ.सचिन भुसारी, डॉ.सतीश भालशंकर, डॉ.सुहास पाठक, प्रा.राम कलाणी, डॉ.माधुरी सावंत, डॉ. स्मिता साबळे,

प्रमुख मार्गदर्शक :

कुलगुरू प्रा.विजय फुलारी, विशेष सहकार्य - प्र-कुलगुरू प्रा.वाल्मिक सरवदे, कुलसचिव प्रा.प्रशांत अमृतकर

स्‍थळ : मॉडेल कॉलेज, घनसावंगी

अशी माहिती विद्यार्थी विकास संचालक डॉ.कैलास अंभुरे व आविष्‍कारचे समन्‍वयक डॉ. भास्कर साठे, आयोजक प्राचार्य डॉ. रामराव चव्हाण, प्रा. संदीप पाटील यांनी दिली

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→25 सप्टेंबर 2024
प्रभावाच्या मुल्यांकनावर कॉंग्रेसचा उमेदवार जाहीर होणार,एकदिलाने एकत्र येत जाहीर झालेल्यां उमेदवाराला सहकार्य करावे कॉंग्रेस च्या मेळाव्यात प्रभारी महेशजी शर्मा यांचा इच्छुकांना सल्ला

प्रभावाच्या मुल्यांकनावर कॉंग्रेसचा उमेदवार जाहीर होणार,एकदिलाने एकत्र येत जाहीर झालेल्यां उमेदवाराला सहकार्य करावे कॉंग्रेस च्या मेळाव्यात प्रभारी महेशजी शर्मा यांचा इच्छुकांना सल्ला

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात