📰 ताज्या घडामोडी

विकासकुमार बागडी यांची व्हाईस ऑफ मिडीयाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

च
Shamsundar chittoda
27 ऑगस्ट 2024•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

व्हाईस ऑफ मिडियाच्या साप्ताहिक विंगसाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. या निवडणूकीमध्ये राज्यभरातील पदाधिकारी आणि पत्रकारांनी मतदान केले असून सदर निवडणूकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. प्रदेश अध्यक्ष म्हणून रोहित जाधव (सांगली), प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून अब्दुल कयुम (छत्रपती संभाजीनगर), सरचिटणीस वामन पाठक (लातूर) तर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जालन्याचे पत्रकार विकासकुमार बागडी यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. सदर निवडणूक व्हाईस ऑफ मिडियाचे संदीप काळे यांच्या संकल्पनेनुसार मार्गदर्शक ठरली. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अ‍ॅड. संजीवकुमार कलकोरी व राज्य कार्याध्यक्ष योगेंद्र दोडकर यांनी काम पाहिले. निवडणूक यशस्वीतेसाठी प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के, विजय चोरडिया, विनोद बोरे, दिव्या पाटील,गणेश शिंदे यांनी पुढाकार घेतला होता.

या निवडीबद्दल विकासकुमार बागडी यांचे व्हाईस ऑफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कव्हळे, राजेश भालेराव, बाबासाहेब कोलते, रवि दानम, कैलास फुलारी, अहेमद नूर, गोविंदप्रसाद मुंदडा, लियाकत अली खान, आकाश मुंदडा, साहिल पाटील, अंकुश देशमुख, लक्ष्मण राऊत, मकरंद जहागिरदार, अशोक मिश्रा, सुनिल खरात, लाव्ह्यू निर्मल, शेख महेजबीन, सय्यद मुश्ताक, अश्पाक पटेल, अजिम खान आदींनी अभिनंदन केले आहे.

----

मुख्यमंत्र्यांसमोर पत्रकारांनी समस्या मांडाव्यात-बागडी

31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी शिर्डी येथे राज्यव्यापी अधिवेशन होत असून या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. तेव्हा उपस्थित पत्रकारांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडण्यासाठी जिल्ह्याचे सर्व साप्ताहिकचे संपादक व पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी केले आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→26 ऑगस्ट 2024
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात