📰 ताज्या घडामोडी

प्रलंबित मागण्यासाठी जालन्यात महसूल कर्मचारी बेमुदत संपावर ,दांगट समितीच्या शिफारशीनुसार संवर्गातील कर्मचार्‍यांची कपात न करता लागू करण्यात याव

च
Shamsundar chittoda
15 जुलै 2024•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

आकृतीबंधाच्या दांगट समितीच्या शिफारशीनुसार संवर्गातील कर्मचार्‍यांची कपात न करता लागू करण्यात यावी, या मागणी सह अनेक मागण्या करीता जालन्यात आजपासून महसूल कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संपावर आहेत.. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अव्वल कारकून, मंडळ अधिकारी संवर्गातील नायब तहसीलदारांच्या पदोन्नतीचे आदेश द्यावेत..यासह इतर मागण्यांसाठी आज पासून महसूल कर्मचारी वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कर्मचारी यांनी आंदोलनाचे हत्यार उपसलेय. दरम्यान आता या बेमुदत संपामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या कामांचा खोळंबा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संपकरांनी आपल्या प्रमुख मागण्या महसुल विभागचा सुधारीत आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी यांची कपात न करता लागू करण्यात यावा, अव्वल कारकुन/मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसिलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करण्यात यावेते, महसुल विभागाचा आकृतीबंध तात्काळ मंजूर करुन पुरवठा विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणारे महसुल कर्मचारी यांना महसुल विभागात सामावून घेण्यात यावेते, वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर काढण्याबाबत तात्काळ शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा, महसुल सहाय्यकाचा ग्रेडपे 1900 वरुन 2400 करण्यात यावा, महसुल सहायक व तलाठी यांना सेवाअंतर्गत एकसमान परिक्षा पध्दती लागू करण्यात याव्यात, महाराष्ट्र शासन, वित्त विभाग यांची अधिसुचना दिनांक 03.02.2023 नूसार तात्काळ अव्वल कारकुन यांची वेतन निश्चिती करण्यात यावी, महसुल सहाय्यकाची सेवा जेष्ठता यादी केवळ महाराष्ट्र महसुल अर्हता परीक्षा नियम 1999 मधील तरतूदीनूसार तयार करण्यात यावी, महसुल विभागातील अधिकारी/कर्मचारी यांची सेवापुस्तिका लेखाधिकारी वेतन पडताळणी पथका ऐवजी समकक्ष असलेल्या महसुल विभागातील नियुक्त लेखाधिकारी यांचे वेतन पडताळणीचे अधिकारी मार्फत

करण्यात यावी, अव्वल कारकुन यां संवर्गाचे पदनाम बदलून सहाययक महसुल अधिकारी असे करण्यात यावे, नायब तहसिलदार संवर्गाचा गेड वेतन 4800 करण्यात यावा. अव्वल कारकून यांना मंडळ अधिकारी पदावर अदला बदली धोरणास नूसार पदस्थापना देण्यात यावी, नायब तहसिलदार पदासाठी अव्वल कारकून/मंडळ अधिकारी यांचेकरीता पदोन्नती विभागीय परीक्षा सरळसेवा याबाबतचे प्रमाणे 70:10:20 असे करण्यात यावे, चतूर्थश्रेणी/शिपाई कर्मचा-यांना पदोन्नती देत असतांना तलाठी संवर्गामध्ये 25% पदोन्नती देण्यात यावी, कोतवाल पदांना चतूर्थश्रेणी - ड दर्जा देण्यात यावा व कोतवाल पदोन्नती कोटा वाढविण्यात यावा. या मागण्याघेऊन आंदोलन आजपासुन सुरू केले आहे.

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→2 जुलै 2024
साप्ताहिक वृत्तपत्रांच्या विविध मागण्यांसाठी 4 जुलै रोजी निवेदन देण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे-विकासकुमार बागडी

साप्ताहिक वृत्तपत्रांच्या विविध मागण्यांसाठी 4 जुलै रोजी निवेदन देण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे-विकासकुमार बागडी

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात