📰 ताज्या घडामोडी

परतूर येथील रेणूका नगरीत अवतरली पंढरी,लहान बालक, वृद्धानी टाळ, मृदुंग, पताका घेऊन दिंडीत घेतला सहभाग

च
Shamsundar chittoda
19 जुलै 2024•⏱️ २ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतुर येथील रेणूका नगर वासीयां कडून गेल्या तीन वर्षा पासून अंखंड आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात येते या ही वर्षी दिडी चे आयोजन करण्यात आले होते.

रेणूका नगर येथील महिलांनी लाल साडी व पुरूषांनी पांढरा ड्रेस परिधान करीत रेणूका नगर येथे श्री विठ्ठल व रुक्मिणीची पूजा करण्यात आली. त्या नंतर श्री विठ्ठल व रुक्मिणी ची पालखी रेणूका नगर,बालाजी मंदीर,महादेव मंदीर चौक,शिवाजी नगर या मार्गाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे नेण्यात आली. यावेळी दिंडीत सहभागी भक्त मंडळीनी कपाळाला चंदनाचा टिळा, हातामध्ये टाळ, घेऊन वारकरी वेशभूषा धारण केली होती.ढोल ताशा सह टाळ व मृदंगाच्या तालावर पाऊली खेळत, पताका नाचवत, फुगडी खेळत दिंडीत सहभाग घेतला. या मधे श्री विठ्ठल व रुक्मिणी यांची वेशभूषा परिधान केलेली चिमुकले हे राहभागी झाले होते तर शहरातील मोढा भागातील नागरीकानीही पारंपारिक वेशभूषेत येऊन दिंडीची शोभा वाढवली.

यावेळी गणेश जेथलिया विलास धुमाळ विजय बोराडे राधेश्याम तापडिया संतोष काकडे राहुल कदम कृष्णा कातारे कार्तिक बोराडे गणेश कासारे व महिला मंडळांनी बाळ गोपाळ आदीनी दिडींत सहभाग घेतला शेवटी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर येथे दिंडीत सहभागी झालेल्या भक्तांचे आभार आबासाहेब कदम यांनी मांनले तर प्रस्ताविक अमर बगडिया यांनी केले

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→19 जुलै 2024
आषाढी एकादशी निमित्त विवेकानंद शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांचे दिंडीचे आयोजन

आषाढी एकादशी निमित्त विवेकानंद शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांचे दिंडीचे आयोजन

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात