📰 ताज्या घडामोडी

यश प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये बालिका दिन उत्साहात साजरा

च
Shamsundar chittoda
3 जानेवारी 2024•⏱️ १ मिनिटे वाचन•
WhatsApp

परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण

दि. 3 जानेवारी रोजी सातोना (खु) येथिल यश प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्रिन्सिपल शामीर शेख हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावरती जयराम चव्हाण तसेच सावित्रीच्या लेकी म्हणून सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या.

सर्वप्रथम अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सावित्रीबाईंच्या वेशभूषेत आलेल्या सर्व विद्यार्थिनींचा उपस्थित महिला शिक्षकांचा संस्थेतर्फे भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

कु.धनश्री बिडवे ,सुरज लिपणे, नेहा बिडवे, तन्वी पवार आणि समृद्धी होंडे या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले मनोगत वक्त केले तसेच अश्विनी कोळपे , राधिका आकात या शिक्षिकानी विद्यार्थ्यांना सावित्री बाई फुले यांच्या जीवनविषयक माहिती दिली.

अध्यक्षीय समारोपात शेख यांनी विद्यार्थ्यांना थोर लोकांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी असा संदेश दिला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सीमा पवार यांनी तर आभार विलास गोरे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्ययानी प्रयत्न केले

💬 आपले मत नोंदवा

या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते? खालील पर्यायावर टॅप करा:

पुढील बातमी→3 जानेवारी 2024
दि जालना पीपल्स बँक निवडणूक ,सचिन सांबरे यांचा विकासकुमार बागडी यांना जाहीर पाठींबा

दि जालना पीपल्स बँक निवडणूक ,सचिन सांबरे यांचा विकासकुमार बागडी यांना जाहीर पाठींबा

वाचा (Read Story)→
दैनिक चकमक डिजिटल आवृत्ती

आजचा संपूर्ण ई-पेपर मोफत वाचा

सर्व पानांचा हाय-डेफिनिशन ई-पेपर आणि PDF डाउनलोड उपलब्ध.

ई-पेपर उघडा 📰

इतर ताज्या बातम्या

सर्व बातम्या पहा ↗
पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*ताज्या बातम्या
13 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

पावसासाठी गणरायाला आमदार लोणीकरांचे साकडे*

शेतकऱ्यांच्या पिकांना पुन्हा जीवनदान मिळावे,बळीराजा सुखी-समाधानी व्हावा; गणेश मंडळांनी धार्मिक भावना जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन*

वाचा ↗
विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;स्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•श्याम सुंदर चित्तोडा

विवेकानंद इंग्लिश स्कूल परतुर येथे लिओ क्लब च्या सहकार्याने ‘शाडू मातीची गणेशमूर्ती’ कार्यशाळा संपन्न;

चिमुकल्यांनी दिला पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश

वाचा ↗
दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहातस्थानिक (जालना / परतूर)
11 सप्टेंबर 2026•शामसुंदर चित्तोडा

दुष्काळाचे सावट तरीही आंबा येथे बैलपोळा उत्साहात

सर्जा-राजाला सजवून शेतकऱ्यांनी केली मनोभावे पूजा; आता वरुणराजाच्या कृपेकडे बळीराजाचे डोळे

वाचा ↗
परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्नताज्या बातम्या
7 सप्टेंबर 2026•Shamsundar chittoda

परतूरमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चा दहीहंडी महोत्सव उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दहीहंडी महोत्सव २०२६ रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी परतूर शहरातील मार्केट कमिटी मैदानावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल

वाचा ↗
पुढील बातमी
📡आपण ऑफलाइन आहात